शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात राजकीय संघर्ष सुरु असताना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद या कित्येक पक्षावर नाराज असल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान शनिवारी त्यांनी वर्षा बंगलावर जाऊ मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने त्या लवकरच शिंदे गटात जाणार असल्याचं दिसून येत आहे.